पश्चिम रेल्वेमार्गावरील उपस्थानकांवर रविवारी रेल्वेरुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड यंत्रणा आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्ती-देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने पाच तासांसाठी जम्बो मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मेगा ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर काम करण्यात येणार असल्याने धिम्या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे, तर काही लोकलगाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याबद्दलची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वे
’कुठे – सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्ग
’कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
’परिणाम – मेगा ब्लॉकमुळे सकाळी १०.३५ पासून ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंतच्या पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या बाहेरगावच्या गाडय़ा धिम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान लोकल गाडय़ांची वाहतूक धिम्या मार्गावरून होणार आहे, तर डाऊन दिशेच्या काही लोकलगाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत.