काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांचे ई-मेल खाते काही हॅकर्सकडून हॅक करण्यात आले होते. यावर त्यांना वारंवार पैशांची मागणीही करण्यात येत होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण ई-मेलशी निगडित असल्याने ते सायबर क्राइम विभागाकडे गेले. त्यावरुन योग्य तो तपास केल्यानंतर हे मेल कोणत्या अकाऊंटवरुन करण्यात येत आहेत याबाबत तपास करण्यात आला. त्यामध्ये योग्य तो शोध लागल्यानंतर या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन परदेशी नागरिकांचा हात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी त्यांच्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केले होते. तसेच या आधीही अशापद्धतीच्या केसमध्ये असणारे सक्रीय असणारे आरोपी मागील काही केसमध्ये फरार होते. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. मात्र आता त्यात यश आले असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा योग्य तो तपास केल्यानंतर इतर गोष्टींची शहानिशा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.