15 December 2019

News Flash

Video : ‘माणूस’पण जपणाऱ्या राजा ढालेंच्या मुलाखतीचे काही अंश

पुढच्या पिढीलाही राजा ढाले यांचे विचार प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही

राजा ढाले म्हणजे दलित चळवळीतलं असं नाव ज्या नावात आक्रमकता होती, धडाडी होती. दलित पँथर या संघटनेचे ते संस्थापक. नामदेव ढसाळ आणि अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या साथीने त्यांनी ही संघटना सुरु केली. मुंबईतील विक्रोळी या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी राजा ढाले यांची प्राणज्योत आज मालवली. मात्र आंबेडकरी चळवळीला वेगळे विचार देणारे, वेगळ्या स्थानावर नेणारे नेते ही त्यांची ओळख कधीही पुसली जाणार नाही. दलितत्व नाही तर माणूसपण अंतिम मानणाऱ्या राजा ढालेंची मुलाखत लोकप्रभामध्ये घेण्यात आली होती. मधु कांबळे आणि विनायक परब यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचे काही अंश खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी

;

दलित चळवळ पुढे नेणाऱ्या राजा ढाले नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांचे विचार त्यांचे भाष्य सगळेच ऐकण्यासारखे आहे यात शंकाच नाही. पुढच्या पिढीलाही त्यांचे विचार प्रेरणादायी ठरणार आहेत.

First Published on July 16, 2019 3:02 pm

Web Title: memories of raja dhale in video interview scj 81
Just Now!
X