08 March 2021

News Flash

अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार

गोवंडी येथील अल्पवयीन तरुणीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

| September 11, 2013 01:18 am

गोवंडी येथील अल्पवयीन तरुणीवर बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. ही मुलगीसुद्धा गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
भायखळा येथे ही १९ वर्षांची गतिमंत मुलगी रहात होती. याच भागात सलीम उर्फ कमाल खान हा तरुण जरीकामाचा कारागीर होता. दोन वर्षांपूर्वी तो कोलकात्याहून आला होता. त्याने या गतिमंद मुलीशी मैत्री वाढवली आणि तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून बलात्कार करत होता. ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पालकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कमाल खानकडे विचारणा केल्यानंतर त्याने लग्न करण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली. पण महिनाभर टाळाटाळ करत अखेर तो कोलकात्याला फरार झाला. त्यामुळे पीडित मुलीच्या वडिलांनी गेल्या २२ ऑगस्ट रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. मंगळवारी आग्रीपाडा पोलिसांनी कोलकात्याला जाऊन कमाल खानला अटक केली. गेल्याच आठवडय़ात गोवंडी येथेही अल्पवयीन मूकबधीर मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. ती सुद्धा गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:18 am

Web Title: mentally challenged minor girl raped in mumbai
Next Stories
1 सुटय़ांवरून इंग्रजी शाळांमध्ये गोंधळ
2 बिल्डरवर गोळ्या झाडणारा महिला वकिलाचा मारेकरी
3 अ‍ॅण्टॉप हिल येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Just Now!
X