News Flash

मनोरुग्ण मुलीच्या मारहाणीत वृद्ध वडिलांचा मृत्यू

मनोरूग्ण मुलीने आपल्या वृद्ध वडिलांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू ओढवल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत कोपर रोड भागात मंगळवारी रात्री घडली.

| May 22, 2014 04:29 am

मनोरूग्ण मुलीने आपल्या वृद्ध वडिलांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू ओढवल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत कोपर रोड भागात मंगळवारी रात्री घडली. रिना नायर (वय ३३) असे या मनोरूग्ण तरुणीचे नाव असून तिला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आनंद नायर (वय ८२), पत्नी यशोदा (७०) व मुलगी रिना हे कुटुंब कोपर रोड भागात राहते. मनोरूग्ण मुलीचा सांभाळ हे वृद्ध दाम्पत्य करीत होते. मंगळवारी रात्री रिनाने आनंद यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद यांचा मृत्यू झाल्याची तक्रार पत्नी यशोदा यांनी पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी रिनाला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 4:29 am

Web Title: mentally challenged woman kills elderly father
Next Stories
1 ठाण्यात ट्राम बारगळणार, आता रिंगरूटचा विचार
2 गिरीश कुबेर यांच्याशी आज ‘लाइव्ह चॅट’!
3 मनसे नगरसेवकाला बेदम मारहाण
Just Now!
X