News Flash

‘त्या’ पोलिसांवर भावनिक दबावतंत्र

अमली पदार्थाची कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला मदत केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या पाच पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे.

| June 1, 2015 02:59 am

अमली पदार्थाची कुख्यात तस्कर बेबी पाटणकरला मदत केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या पाच पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. अटक केलेले आरोपी पोलीस असल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना विशिष्ट प्रकारच्या तंत्राचा वापर करावा लागत आहेत. त्यासाठी भावनिक दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुख्यात अमली पदार्थाची तस्कर बेबी पाटणकरशी जवळीक असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले, पोलीस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराव माने, आणि हेड कॉन्स्टेबल यशवंत पार्टे आदींचा त्यात समावेश आहे. ९ मार्चला धर्मा काळोखेला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. तेव्हापासून अटक करण्यात आलेले पाच पोलीस बेबीच्या संपर्कात होते. १० मार्चला गायकवाड यांनी बेबीची भेट घेऊन तिला पळून जाण्यास सांगितले होते. त्यानंतरही बेबी ११ मार्चपर्यंत सुहास गोखले यांच्या संपर्कात होती. या प्रकरणाची गंभीरता गोखले यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहीत होती. तरी त्यांनी १४ मार्चपर्यंत बेबीबाबत वरिष्ठांना माहिती का दिली नव्हती याचा तपास पोलीस करीत आहेत. निवृत्तीच्या आदल्या दिवशी गोखले यांना अटक करणे हा योगायोग असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 2:59 am

Web Title: meow meow drug racket mumbai cops helped baby evade arrest 2
Next Stories
1 काळबादेवी येथील दुर्घटनेत अनेक त्रुटी
2 निवृत्तीनंतरही ढोबळे यांना विश्रांती नाहीच..
3 खासगी प्रॅक्टिस केल्यामुळे ‘जे. जे’. तील डॉक्टर निलंबित
Just Now!
X