11 December 2017

News Flash

मर्सिडीज कारने ५ जणांना चिरडले

मुंबईमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला परिसरात भरधाव मर्सिडीज कारने पाच

मुंबई | Updated: February 18, 2013 11:13 AM

मुंबईमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला परिसरात भरधाव मर्सिडीज कारने पाच जणांना चिरडले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आहे. अपघातानंतर चालक मर्सिडीज कारसह फरार झाला आहे. पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत.  
जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये एक पटकथा लेखक आणि एका वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश असून अन्य तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातामध्ये कारचा लोगो आणि नंबर प्लेट अपघातानंतर तुटला असून पोलिसांनी या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. याआधी मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणात वांद्र्यात होंडा अकॉर्ड गाडीनं पाच जणांना दिलेल्या धडकेत दोघांचा बळी गेला होता.

First Published on February 18, 2013 11:13 am

Web Title: mercedes car hits 5 people
टॅग Mercedes