News Flash

आता बंद करणारे व्यापारीच दोन वर्षांपूर्वी एलबीटीचे समर्थक

राज्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)ने स्थानिक संस्था कर (एलबीटी)विरोधात शुक्रवारी मुंबई आणि नागपूर बंदची हाक देत मुंबईत भव्य मोर्चा

| April 26, 2013 04:58 am

राज्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)ने स्थानिक संस्था कर (एलबीटी)विरोधात शुक्रवारी मुंबई आणि नागपूर बंदची हाक देत मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला असला तरी याच व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता, असे उघडकीस आले आहे.
अन्य महापालिकांबरोबरच मुंबई आणि नागपूरमध्ये येत्या १ ऑक्टोबरपासून स्थानिक संस्था कराच्या विरोधात फॅमने शुक्रवारी मुंबई आणि नागपूर बंदची हाक दिली असून, त्यात सर्व क्षेत्रांतील घाऊक आणि किरकोळ व्यापारी सहभागी होणार आहेत. तसेच आझाद मैदानात व्यापाऱ्यांच्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण- डोंबिवली आदी भागांतील व्यापारी सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून ‘एलबीटी हटवा नाहीतर मते मिळणार नाहीत’ असा इशारा सरकारला देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:58 am

Web Title: merchants were supported to lbt two years back
टॅग : Lbt,Merchants
Next Stories
1 एसआरएवरून रमाबाई नगरात राडा!
2 सिंचन घोटाळ्याची चौकशी राष्ट्रवादीसाठी तापदायक ?
3 कॉंग्रेसपुढे जागा राखण्याचे, तर राष्ट्रवादीपुढे संख्याबळ वाढविण्याचे आव्हान
Just Now!
X