News Flash

आजपासून ‘मेट्रो १’च्या फेऱ्यां घटणार

मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घट शक्यता असून या मार्गिकेवरील फेऱ्यां कमी करण्याचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

राज्य शासनाने लागू केलेल्या कडक नियमांच्या पाश्र्वाभूमीवर सरकारने खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घट शक्यता असून या मार्गिकेवरील फेऱ्यां कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सध्या मुंबईसह राज्यभरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने सोमवारी रात्रीपासून कडक नियम लागू केले आहेत. त्याचा परिणाम मेट्रो प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मंगळवारपासून मेट्रो फेऱ्यां कमी केल्या जातील, असे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मंगळवारी प्रवाशी संख्या पाहून गरज भासल्यास फेऱ्यां वाढवल्या किंवा कमी केल्या जातील, अशी माहिती मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी दिली.

करोनामुळे गेल्यावर्षी टाळेबंदी लागू झाल्यानंतर मेट्रो सेवा खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मेट्रो पुन्हा धावू लागली होती. मात्र तिच्या फेऱ्यां कमी करण्यात आल्या होत्या. सध्या  मेट्रोच्या दरदिवशी २८० फेऱ्यां सुरू होत्या. तसेच कार्यालयीन दिवसात मेट्रोमधून दर दिवशी १ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. सद्यस्थितीत मेट्रोकडून फेऱ्यां कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने मेट्रो स्थानकावर प्रवाशांचे तापमान तपासले जाईल, सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेण्यात येईल आणि निर्जंतुकीकरण केले जाईल, त्याचबरोबर मास्क घालणे बंधनकारक असेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 1:02 am

Web Title: metro 1 fares will be reduced from today abn 97
Next Stories
1 सचिन वाझे यांची महागडी दुचाकी जप्त
2 मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने
3 दाट वस्त्यांत निर्बंधांची ऐशीतैशी
Just Now!
X