News Flash

मेट्रो-३ चे कफ परेड ते सीएसएमटी स्थानक पर्यंतचे भुयारीकरण १०० टक्के पूर्ण!

पॅकेज-१ अंतर्गत भुयारीकरणाचा ३८ वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे.रे.कॉ) कफ परेड ते सीएसएमटी स्थानकापर्यंतचे ऐतिहासिक वारसा इमारती जवळील भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. पॅकेज-१ अंतर्गत भुयारीकरणाचा ३८ वा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा अप-लाईन मार्गाचा ५५७ मीटर भुयारीकरणाचा टप्पा एकूण ४०५ रिंग्जच्या सहाय्याने १४९ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरण टप्प्यासह पॅकेज -१ मधील भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे.

सूर्या-१ या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे .
“आज गाठलेल्या भुयारीकरणाच्या टप्प्यामुळे मेट्रो-३ च्या एकूण सात पैकी सहा पॅकेजचे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वारसा इमारती नजीक भुयारीकरण करणे हे या प्रकल्पातील अनेक आव्हानांपैकी एक होते. मात्र आमच्या अभियंत्यांनी व कामगारांनी सर्व सुरक्षेविषयक दक्षता घेत हे काम कौशल्यपूर्ण पद्धत्तीने पूर्ण केले याचा मला आनंद वाटतो,” असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्च गेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-१ च्या भुयारीकरणाचा तपशील:-

१) कफ परेड ते विधान भवन (अप लाईन १२२८ मी, डाऊन लाईन १२५४ मी)
२) विधान भवन ते चर्चगेट अप लाईन ४९८ मी, डाऊन लाईन ४८१ मी)
३) चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाईन ६५४ मी)
४) हुतात्मा चौक ते सीएसएमटीअप लाईन (अप लाईन ५५७ मी डाऊन लाईन ५६९मी)
मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५२ किमी म्हणजेच ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 6:00 pm

Web Title: metro 3 cuffe parade to csmt station tunnelling is 100 percent complete msr 87
Next Stories
1 “…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत!
2 करोनावर आयुर्वेदिक औषध देतो सांगून फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक
3 तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ३० टक्के खाटा वाढवणार!
Just Now!
X