28 January 2020

News Flash

‘मेट्रो ३’च्या १३ स्थानकांचे खोदकाम १०० टक्के पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गाच्या १३ स्थानकांचे १०० टक्के खोदकाम पूर्ण झाले.

एकूण ८७ टक्के खोदकाम

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गाच्या १३ स्थानकांचे १०० टक्के खोदकाम पूर्ण झाले. उर्वरित १३ स्थानकांचे खोदकाम यावर्षीच्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल.

या संपूर्ण भुयारी मार्गावर एकूण २६ स्थानके असून स्थानकांचे एकूण ८७ टक्के खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या कामाला आणखी गती प्राप्त होईल. उर्वरित स्थानकांचे खोदकाम युद्धपातळीवर सुरू असून पुढील तीनचार महिन्यात ते पूर्ण होईल.’ असे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी सांगितले.

उर्वरित स्थानकांपैकी सांताक्रूझ स्थानकाचे खोदकाम ९३ टक्के पूर्ण झाले असून, वरळी, दादर, शीतलादेवी, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल या स्थानकांचे खोदकाम ८० टक्क्य़ांहून अधिक पूर्ण झाले आहे. मेट्रो ३ साठी ग्राऊंड ब्रेकिंगला २०१६च्या अखेरीस सुरुवात झाली. त्यांतर दोन वर्षांत खोदकामानंतर अन्य कामांना वेग आला आहे. स्लॅब, काँक्रीटीकरण, छताचे काम आदी विविध स्थानकांवर वेगाने काम सुरू असून कफ परेड स्थानकाच्या छताचे कामदेखील पूर्ण होत आले आहे. एमआयडीसी, सिद्धिविनायक मंदिर या स्थानकांचे बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या ३२ टप्प्यांपैकी २४ टप्प्यांचे भुयारीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित भुयारीकरण सप्टेंबरअखेर पूर्ण होईल. मार्गिकेच्या शेवटच्या पॅकेजचे भुयारीकरण संपूर्णपणे पूर्ण झाले आहे.

१०० टक्के खोदकाम पूर्ण झालेली स्थानके

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए-आंतरदेशीय, सीएसएमआयए-आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे.

First Published on January 15, 2020 3:22 am

Web Title: metro 3 excavation work of 13 stations completed zws 70
Next Stories
1 शाहीर अमर शेख यांचे स्मारक लोकार्पणाच्या प्रतीक्षेत
2 ब्रिटिशकालीन फेररे पूल उद्या मध्यरात्रीपासून बंद
3 कॅफे, उपाहारगृहांत ‘स्टार्टअप’ची कार्यालये!
Just Now!
X