News Flash

सुरक्षा रक्षक तैनात करण्याची पालिकेची सूचना

कांजूरमार्ग येथील भूखंडाजवळील जमिनीवर मोफत घरे मिळणार असल्याची अफवा-वार्ता रविवारी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती

(संग्रहित छायाचित्र)

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रस्तावित असलेल्या भूखंडालगतच्या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी तेथे सुरक्षा रक्षक नेमावे, अशी सूचना करणारे पत्र मुंबई महापालिकेने सोमवारी म्हाडा आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडसाठी राखीव असलेल्या भूखंडाजवळील जमिनीवर मोफत घरे मिळणार असल्याची अफवा-वार्ता रविवारी वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यामुळे मुंबईतील काही भागातील नागरिकांनी तेथे धाव घेत जागा अडविल्याची चर्चा सुरू होती. या भूखंडावर काही मंडळींनी बांबू उभारून जागा अडविल्याचे  निदर्शनास आले होते. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अतिक्रमण हटविले. हा भूखंड जिल्हाधिकारी आणि म्हाडाच्या अखत्यारित आहे. या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून तेथे सुरक्षा रक्षक तैनात करावे, असे पत्र पालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी जिल्हाधिकारी आणि म्हाडाला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:27 am

Web Title: metro car shed at kanjurmarg municipal notice to deploy security guards abn 97
Next Stories
1 कांजूर भूखंड हस्तांतरणाचा आदेश मागे घेता की रद्द करू ?
2 महिला अत्याचार प्रतिबंध विधेयक सादर
3 ‘आघाडी सरकार साकारण्यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा’
Just Now!
X