मर्यादित मनुष्यबळातच कामे; यंत्रचालक, कुशल कामगारांचा तुटवडा

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ या बहुचर्चित प्रकल्पाला करोना व लागलेल्या टाळेबंदीचा फटका बसला आहे. आरे कॉलनी ते वांद्रे-कुर्ला संकूल डिसेंबर २०२१ पर्यंत आणि वांद्रे-कु र्ला संकूल ते कफ परेड जून २०२२ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट गाठणे शक्य नसल्याचे एमएमआरसीएलकडून (मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशन लिमिटेड) स्पष्ट करण्यात आले आहे. करोना व त्याचा होत असलेला प्रभाव आणि त्यावरील उपायांची अनिश्चितता यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे आता सांगणे अवघड असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रकल्प आणखी रखडण्याची शक्यता आहे.

करोनामुळे मार्च २०२०पासून टाळेबंदी लागली. त्यामुळे राज्यासह मुंबईतील विविध प्रकल्पांची कामे थांबली. यात मेट्रो प्रकल्पांनाही फटका बसला. प्रकल्पाच्या बांधकामास ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण ७० टक्के  काम पूर्ण झाले आहे. कु लाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ मधील ३३.५ किलोमीटर असून यात २७ स्थानके  येतात. २६ भुयारी आणि एक स्थानक समांतर आहे. मात्र प्रकल्प पूर्ततेचे नियोजन अमलात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो वर्षांअखेरीस मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता धूसर आहे.

करोनाकाळात कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामावर झालेल्या परिणामाची माहिती एमएमआरसीएलकडून मागवण्यात आली होती. ही माहिती देताना प्रकल्पातील विविध कामे सध्या प्रगतिपथावर असून प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. दिलेल्या माहितीत प्रकल्पातील विविध कामे मर्यादित मनुष्यबळाद्वारे केले जात आहेत. शिवाय करोनामुळे प्रकल्पाला कच्चा माल पुरवठा करणारी यंत्रणा प्रभावित झालेली आहे. विशेष यंत्रावर काम करणारे यंत्रचालक, ब्लास्टिंग कामातील कुशल कामगार यांचा सध्या तुटवडा जाणवत असल्याचेही स्पष्ट केले. याव्यतिरिक्त प्रवास र्निबधांमुळे प्रकल्पासाठी काम करणारे तज्ज्ञ व सल्लागारही उपलब्ध होऊ शकत नसल्याचे एमएमआरसीएलकडून सांगण्यात आले.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो प्रकल्प

ल्ल एकूण ९६ टक्के  भुयारीकरण

ल्ल स्थानकांचे बांधकाम ६९ टक्के  पूर्ण झाले आहे.

ल्ल स्थानकांच्या बांधणीचे काम व पॅकेज-३ अंतर्गत येणाऱ्या सायन्स म्युझियम ते मुंबई सेंट्रल दरम्यान भुयारीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.

ल्ल स्थापत्य कामांव्यतिरिक्त स्थानकांमध्ये पुनर्भराव करणे, रूळ बसविण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय प्रणाली यंत्रणांची एकंदरीत २८.३२ टक्के  कामे पूर्ण झाली आहेत.

ल्ल विविध प्राणली यंत्रणांच्या संरेखनाचे ९०.५ टक्के  काम पूर्ण झाले आहे.

ल्ल याशिवाय सारीपुत नगर येथील विद्युत उपकेंद्राचे ६६ टक्के

ल्ल धारावी व सायन्स म्युझियम येथील विद्युत उपकेंद्राचे अनुक्रमे ६४ टक्के  व ६१ टक्के  काम पूर्ण झाले आहे.

कारशेडबाबत ठोस उत्तर नाहीच

मेट्रो-३ साठी कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे. परंतु याबाबत माहिती मागितली असता ठोस असे उत्तर एमएमआरसीएलकडून देण्यात आले नाही. प्रकल्पाची किं मत २०१६ मध्ये २३ हजार १३६ कोटी रुपये होती. आधीच विविध कारणांनी उशीर झालेल्या व त्यातही करोनाचा फटका बसल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होणार असल्याने त्याचा खर्च वाढला आहे. याबाबत निश्चित माहिती देण्यात आली नाही.