मुंबईतील रेल्वेसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवर सतत तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर येत असतानाच आता मेट्रोचेही रडगाणे सुरु झाले आहे. आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने चालत होती.
तांत्रिक कारणांमुळे वर्सोवा व घाटकोपरकडे जाणारी वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरु होती. तसेच, या स्थानकांवरील इंडिकेटर्सही बंद पडल्याने प्रवाशांचा आणखीनच पारा चढला.  मुंबई लोकलच्या रडगाण्याचा कित्ता गिरवत आता मुंबई मेट्रोनेही मुंबईकरांची पुरती निराशा करण्यास सुरूवात केल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.