‘म्हाडा’तर्फे घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये अंध व अपंगांसाठीचे आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता दोनवरून तीन टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या सोडतीमध्ये त्यांच्यासाठी राखीव घरांची संख्या २५ वरून दहाने वाढून ३५ झाली आहे.
‘म्हाडा’तर्फे बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये विविध सामाजिक आरक्षणांबरोबरच अंध व अपंगांसाठीही घरे आरक्षित ठेवली जातात. आतापर्यंत या गटासाठी दोन टक्के घरे राखीव होती. त्यानुसार मे २०१३ च्या सोडतीसाठी जाहीर झालेल्या १२४४ घरांच्या सोडतीमध्ये दोन टक्के या प्रमाणे २५ घरे अंध व अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आली होती.
दरम्यान उच्च न्यायालयात याप्रकरणी दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणीत ७ मे रोजी उच्च न्यायालयाने अंध व शारीरिकदृष्टय़ा अपंग या गटासाठी तीन टक्के आरक्षण ठेवण्याबाबत निर्देश दिले. तसेच अपंगत्वाच्या व्याख्येतही स्पष्टता आणली गेली आहे. त्यानुसार अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोगग्रस्त, श्रवणदोष, मतिमंदत्व, मानसिक रुग्ण आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती या गटातून अर्ज करू शकतात. अपंग गटाचे आरक्षण वाढल्याने यंदाच्या सोडतीत या गटातील लोकांना उपलब्ध असलेल्या घरांच्या संख्येत दहाने वाढ झाली आहे. दोन टक्के प्रमाणे २५ घरे या गटासाठी होती. आता त्यांची संख्या ३५ झाली आहे.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ST buses
एसटीच्या मार्गात आचारसंहितेचा अडथळा