22 November 2017

News Flash

खूशखबर! १० नोव्हेंबरला म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी

१६ सप्टेंबरपासून लोकांना या सोडतीसाठी अर्ज भरता येतील.

मुंबई | Updated: September 14, 2017 7:37 PM

MHADA Lottery 2017 : ‘म्हाडा’च्या या आगामी सोडतीमधील घरांची संख्या, ठिकाण आणि दरपत्रकाबाबतचा मसुदा अंतिम झाला असून याबाबतची जाहिरात उद्या प्रसिद्ध होणार आहे.

जागांचे भाव गगनाला भिडलेल्या मुंबईत सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये घरे उपलब्ध करून देणाऱ्या, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) घरांची १० नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार आहे. ‘म्हाडा’च्या या आगामी सोडतीमधील घरांची संख्या, ठिकाण आणि दरपत्रकाबाबतचा मसुदा अंतिम झाला असून याबाबतची जाहिरात उद्या प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर १६ सप्टेंबरपासून लोकांना या सोडतीसाठी अर्ज भरता येतील. म्हाडाच्या ८१९ घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली या ठिकाणी एकूण आठ घरांच्या सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ घरांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड येथील एकूण २८१ घरांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ घरांचा सोडतीत समावेश आहे.

सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी दि. १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. २१/१०/२०१७ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारास नोंदीत माहितीमध्ये दिनांक १६/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २२/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. याचबरोबर, बँकेत डीडी स्वीकृती दि. १७/०९/२०१७ ते दि. २५/१०/२०१७ या कालावधीत केली जाणार आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. NEFT / RTGS द्वारे चलन निर्मिती दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २३/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. १७/०९/२०१७ दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ पर्यंत कालावधी असणार आहे.डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. १७/०९/२०१७ रोजी दुपारी २ ते दि. २४/१०/२०१७ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.

First Published on September 14, 2017 6:36 pm

Web Title: mhada lottery 2017 mhada lottery for homes in mumbai will be on 10 november