मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठीची सोडत १ मार्चला सकाळी ११ वाजता वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत असेल.

या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहतील.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे  वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत ७२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) येथे २६३० सदनिका आणि लोअर परळ येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौरस फुटांच्या वन बीएचके  स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे.

२०१० मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फ त गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गिरणी कामगारांकडून एकू ण १ लाख १० हजार ३२३ अर्ज प्राप्त झाले. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून २०११ मध्ये पुन्हा गिरणी कामगार वारसांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार ३८ हजार ३८८ अर्ज प्राप्त झाले.

या दोन्ही मोहिमांतर्गत सहभागी न होऊ  शकलेल्या अर्जदारांना समाविष्ट करून घेण्याकरता सन २०१७ मध्ये पुन्हा माहिती संकलन मोहीम राबवण्यात आली. अशा प्रकारे एकू ण १ लाख ७४  हजार ३६ अर्ज गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून प्राप्त झाले आहेत.

आतापर्यंत ८ हजार ४९० जणांना ताबा

यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ६ हजार ९२५ सदनिकांची संगणकीय सोडत २८ जून, २०१३ रोजी काढण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यांतर्गत २६३४ सदनिकांची सोडत ९ जून, २०१६ रोजी काढण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यांतर्गत एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत (रेंटल हौसिंग स्कीम) प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील (१६० चौ फुटांच्या दोन सदनिका मिळून एक) अशा २ हजार ६३४ जोड सदनिकांची सोडत २ डिसेंबर, २०१६ मध्ये काढण्यात आली. अशा प्रकारे अद्यापपर्यंत मुंबई मंडळातर्फे  एकूण ११ हजार ९७६ सदनिकांपैकी ८ हजार ४९० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.