News Flash

सोनसाखळी चोरणारा अल्पवयीन ताब्यात

सोनसाखळी चोरणाऱ्या एका अल्पवयीनाला एमएचबी पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तो हे कृत्य करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

| November 16, 2014 02:21 am

सोनसाखळी चोरणाऱ्या एका अल्पवयीनाला एमएचबी पोलिसांनी ताब्यात घेतले. अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी तो हे कृत्य करीत होता, असे  पोलिसांनी सांगितले.  
दहिसरच्या रावळपाडा येथे पहाटे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न या आरोपी अल्पवयीनाने केला होता. महिलेने आरडाओरड करताच गस्तीवरील पोलिसांनी मोटारसायकलीवरून पळून जाणाऱ्या अल्पवयीनाचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक सोन्याचे मंगळसूत्र आणि एक सोनसाखळी सापडली. त्याने परिसरात पाच सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली आहे. त्याची रवागनी डोंगरी बालसुधारगृहात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 2:21 am

Web Title: mhb police arrested minor chain snatcher
टॅग : Chain Snatcher
Next Stories
1 डेंग्यूग्रस्त डॉक्टरची मुस्कटदाबी?
2 स्फोटात तीन मुले जखमी
3 कल्याण-डोंबिवलीत महिनाभर पाणीकपात
Just Now!
X