12 August 2020

News Flash

‘दुधाला वाढीव दर न मिळाल्यास आंदोलन तीव्र’

भाजप-किसान सभेचा सरकारला इशारा

संग्रहित छायाचित्र

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती लिटर १० रुपयांचे अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीच्या निर्यातीसाठी किलोमागे ५० रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी भाजप तसेच किसान सभेने शनिवारी राज्यभर केलेल्या आंदोलनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या प्रश्नावर सरकारने वेळीच तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

दूध दरवाढीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीतर्फे  राज्यभर अहिंसक मार्गाने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्य़ात तर पक्षाच्या अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली विविध जिह्य़ात आंदोलन करण्यात आले. मुंबईत पक्षातर्फे  गोरेगावमध्ये महानंद डेअरीच्या समोर आंदोलन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:21 am

Web Title: milk does not get increased rate agitation intensifies abn 97
Next Stories
1 …आता मास्क आणि सॅनिटाइजरच्या लुटमारीला लागणार चाप!
2 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मोठ्या भावाचा करोनामुळे मृत्यू
3 मुलींनी केली मोदींची काकड आरती; जाणून घ्या पहाटे चारला झालेल्या ‘त्या’ आंदोलनाबद्दल
Just Now!
X