News Flash

गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याचा गृहनिर्माण मंत्र्यांचा मनोदय

गिरणी कामगारांना मोफत घर देण्याचा मनोदय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला, तर झोपडपट्टीमुक्त मुंबईचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारण्याचा निर्धार राज्यमंत्री

| January 2, 2015 05:03 am

गिरणी कामगारांना मोफत घर देण्याचा मनोदय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला, तर  झोपडपट्टीमुक्त मुंबईचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकारण्याचा निर्धार राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला. झोपडीमुक्त मुंबई, मोफत घरे अशा मागण्या व योजनांना पुढील काळात चालना मिळण्याची चिन्हे आहेत.
गिरणी कामगारांची संख्या थोडी असून काही जण मूळ गावी गेले आहेत. त्यांना किंवा त्यांच्या वारसांना मुंबईत आणून घरे द्यावी लागणार असून ती मोफत असावीत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याबाबत धोरण ठरविण्यासाठी बैठक बोलावितील, तेव्हा मी त्यावेळी माझे मत मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण व शहरी भागात गरीब व आदिवासांनी घरे देण्याच्या वेगवेगळ्या योजना असून घरांच्या किंमतींमध्येही तफावत आहे. केंद्राने हा निधी एकत्रितपणे दिला तर त्यातील तफावत निधी देणे राज्य सरकारला सोयीचे होईल, असेही मेहता यांनी सांगितले.
म्हाडाच्या लॉटऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. त्याची चौकशी केली जाईल. त्यामध्ये दलालांनी गैरव्यवहारातून घरे बळकावली असतील, ती काढून घेतली जातील. पण सर्वसामान्यांना  त्रास होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई झोपडीमुक्त करणार-वायकर
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु, असे राज्यमंत्री पायकर यांनी मंत्रालयातील आपल्या दालनाचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले. म्हाडा व महापालिकेच्या वादात २०० हून अधिक प्रकल्प अडकले आहेत. तो वाद दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. झोपु योजना व उपकरप्राप्त इमारतींचा दर्जाही समान ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 5:03 am

Web Title: mill workers mumbai
Next Stories
1 मध्य रेल्वे मार्गावरील १० गाड्यांचं नुकसान; संध्याकाळच्या ३० ते ४० फे-या रद्द
2 ‘रिडल्स इन हिंदुइझम’चा मराठी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर
3 ‘तिसऱ्या मुंबई’चा मार्ग मोकळा
Just Now!
X