News Flash

गिरणी कामगारांचा मोर्चा रद्द

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन पुन्हा एकदा राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आयोजित करण्यात आलेला गिरणी कामगारांचा मोर्चा रद्द

| January 17, 2013 05:15 am

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन पुन्हा एकदा राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर आयोजित करण्यात आलेला गिरणी कामगारांचा मोर्चा रद्द झाला. तसेच घरांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर गिरणी कामगारांच्या नेत्यांची २५ जानेवारीला बैठक होणार आहे. म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरे कामगारांना तातडीने मिळावीत, गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत, या मागण्यांसाठी पाच कामगार संघटनांतर्फे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कामगार नेत्यांबरोबर मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत दिले. तसेच २५ जानेवारी रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:15 am

Web Title: mill workers rally cancelled
टॅग : Rally
Next Stories
1 सहकारावरील पकड सुटण्याच्या भीतीने राजकारणी अस्वस्थ
2 दुष्काळामुळे पाण्याला पिण्यासाठीच प्राधान्य
3 ‘एका क्षणात’ आचारसंहितेचा भंग?
Just Now!
X