मागील दोन दिवसांच्या गारव्यानंतर शुक्रवारी शहरातील किमान तापमानाचा पारा अजून खाली घसरला असल्याने भरदुपारीही हवेत चांगला गारवा जाणवत होता. किमान तापमानातील घट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून कमाल तापमानातही घट होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि शहर परिसरात किमान तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत, तर कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. शुक्रवारी किमान तापमानात अजून घट होत १४.४ अंश से.पर्यंत खाली आले. त्यामुळे शुक्रवारची सकाळ गुलाबी थंडी घेऊन आली. बोरिवली ११.०३ आणि पवई येथे १३.५४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. पनवेलमध्ये १०.६० अंश से.पर्यंत खाली गेली असून विक्रमी नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अनुमानानुसार पुढील दोन-तीन दिवस तापमानात घट अपेक्षित आहे.