News Flash

लांबपल्ल्याच्या साधारण श्रेणीचे किमान तिकीट दर आता १० रुपये

किमान तिकिटाचे शुल्क पाच रुपयांवरून दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

उपनगरीय लोकल मार्गवगळता अन्य मार्गावरील किमान तिकिटाचे शुल्क पाच रुपयांवरून दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. ही वाढ उपनगरीय सेवावगळता केवळ द्वितीय श्रेणी अथवा साधारण श्रेणीसाठी लागू राहणार असून २० नोव्हेंबरपासून भाडेवाढ लागू होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे शुल्क दहा रुपये एवढे आहे. मात्र प्रवासासाठीच्या किमान तिकिटाचे शुल्क पाच रुपये आहे. त्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी हे पाच रुपयांचे तिकीट काढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:01 am

Web Title: minimum train fare increased from rs 5 to rs 10
Next Stories
1 संजय दत्तला ‘एके ४७’ दिल्याने दाऊदने भावाला चोपले होते!
2 बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच – मुख्यमंत्र्यांची घोषणा
3 दडून बसलेल्या थंडीने स्वेटर विक्रेत्यांना ‘कापरं’
Just Now!
X