28 September 2020

News Flash

वीर सावरकरांबाबत संजय राऊत यांनी मांडलेलं मत वैयक्तिक-आदित्य ठाकरे

देशाचा विकास कसा होईल त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे

संग्रहित छायाचित्र

वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन जे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ती पक्षाची भूमिका नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतिहासावरच किती दिवस बोलत बसायचं? असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा ज्या स्वातंत्र्यासाठी ते लढले तो देश विकास करतो आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा असा सल्लाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता दिला आहे.

काय म्हटलं होतं संजय राऊत यांनी ?

वीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस अंदमानात पाठवा. त्यांना समजेल की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काय यातना भोगल्या. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही वीर सावरकर यांचं कार्य ठाऊक आहे. मात्र सावरकरांना भारतरत्न द्यायचं की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा असतो. सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातली 14 वर्षे काळकोठडीत घालवली आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना भारतत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं अशी शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे. सावरकर यांना भारतरत्न देणाऱ्यांना जे विरोध करतील मग ते अगदी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी जिथे शिक्षा भोगली तिथे दोन दिवस पाठवायला हवं

संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य काँग्रेसला उद्देशूनच केलं आहे अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता काँग्रेस नेते याबाबत काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 2:22 pm

Web Title: minister aditya thackeray suggestion to mr sanjay raut on savarkar bharatratna subject scj 81
Next Stories
1 वीर सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा-संजय राऊत
2 माटुंगा स्थानकाजवळ रुळाला तडे, पश्चिम रेल्वे विस्कळीत
3 फक्त ४५ टक्के निधीचा वापर
Just Now!
X