News Flash

‘इस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुख यांचे नाव द्या

पालकमंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘इस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून ही मागमी केली आहे.

मुंबईची वाहतुककोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या इस्टर्न फ्री वे या मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला आहे, असं अस्लम शेख यांनी पत्रात नमूद केलं आहे.

“इस्टर्न फ्री वेची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील ‘पी डीमोलो रोड पासून ते चेंबूर येथील पुर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या मार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोचपावती असेल,” असंही अस्लम शेख यांनी पत्रात नमूद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 3:56 pm

Web Title: minister aslam sheikh demands to change eastern free way name to former cm vilasrao deshmukh writes letter cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 “वेळ पडली तर उद्धव ठाकरेंनाही…,” राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरे आक्रमक
2 राज्यपालांनी राज ठाकरेंना दिला शरद पवारांना भेटण्याचा सल्ला, म्हणाले…
3 मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत तर राज ठाकरेंना मराठीत माफीनामा; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
Just Now!
X