मुंबई : ‘संपूर्ण मंत्रिमंडळासह ‘तान्हाजी’ चित्रपट पाहणार असून असा चित्रपट बनवा की जगाने कौतुक केले पाहिजे’ असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुंबई महापालिकेतर्फे मंगळवारी प्लाझा सिनेमा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वाईल्ड लाईफ मुंबई ’ या चित्रफितीच्या मुहूर्त समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.  या कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीणसिंह परदेशी  उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबईचा नैसर्गिक वारसा दर्शवणाऱ्या वाईल्ड लाईफ मुंबई या चित्रफितीचा काही भाग दाखवण्यात आला. ‘शहराची खरी बाजू समोर आणण्यासाठी आयुक्त काम करत आहेत, असे सांगत मुंबई म्हणजे चटई क्षेत्रफळ असून कुठेही चटई अंथरा’ असा टोलाही त्यांनी यावेळेस हाणला. या वेळेस ‘वाईल्ड कर्नाटक’ लघुपटाच्या धर्तीवर ‘वाईल्ड लाईफ मुंबई’ हा लघुपट तयार करण्यात येणार असून त्याचा मुहूर्तही पार पडला.  तसेच नगरसेवक आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी तान्हाजी चित्रपटाच्या खास प्रयोगाचे आयोजन करण्यात आले  होते.