28 September 2020

News Flash

व्यायामशाळा सुरू करण्यास मंत्र्याची मंजूरी

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदीच्या काळात बंद असलेल्या व्यायामशाळा सुरू करण्यास मान्यता देण्याच्या फाइलवर आपण स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर आदेश निघेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्र वारी सांगितले. मुंबईत उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत विचार करण्यासाठी लवकरच एक बैठकही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात व्यायामशाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, असे संकेत सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे व वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी जुलैच्या अखेरीस दिले होते. त्यामुळे १ ऑगस्टपासून व्यायामशाळा सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने व्यायामशाळा चालकांनी परिवहनमंत्री अनिल परब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदींची भेट घेऊन केंद्राच्या नियमावलीनुसार राज्यात  व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्याबाबत मागणी केली.

टाळेबंदीतून इतर अनेक व्यवसायांना सवलत दिली आहे. त्यामुळे व्यायामशाळा सुरू कराव्यात अशी मागणी व्यायामशाळा चालकांकडून करण्यात येत होती. राज्यात व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मी कालच याबाबतच्या फाइलवर सही केली आहे आणि ही फाइल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी मिळू शकेल, असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले. सामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा कधी सुरू होणार याबाबत बोलताना आणखी दोन दिवसांत बैठक होईल व त्यात विचार होईल, असे त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:13 am

Web Title: ministers approval to start gymnasium abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या पुढे
2 सुशांत प्रकरणी जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या!-संजय राऊत
3 पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, दोन तास सुरु होती चर्चा; सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडलं?
Just Now!
X