मंत्रालयात करोनाच्या शिरकावानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कर्मचाऱ्यांचे कामाचे तास विभागा, एक दिवसाआड, तीन तीन दिवस किंवा एक एक आठवडय़ाच्या पाळीनुसार कामावर बोलवा, असे आदेश मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवारी सचिवांना दिले आहेत.

करोना प्रादुर्भावाच्या काळात मंत्रालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुरुवातीस २५ टक्के, त्यानंतर ५० टक्के आणि प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १०० टक्के उपस्थिती लागू करण्यात आली होती. मात्र मुंबई तसेच महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यातच मंत्रालयात वाढलेल्या वर्दळीमुळे महसूल विभाग, शिक्षण विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली.