News Flash

क्राइम पेट्रोल पाहून अल्पवयीन मुलाने केली १० वर्षाच्या मुलाची हत्या

क्राइम पेट्रोल ही सीरियल पाहून हत्या केल्याची कबुली या मुलाने पोलिसांकडे दिली आहे

क्राइम पेट्रोल ही मालिका पाहून एका अल्पवयीन मुलाने दहा वर्षांच्या मुलाच्या हत्या केल्याचा प्रकार मुंबईतील साकीनाका भागात घडला आहे. एवढेच नाही तर या अल्पवयीन मुलाने १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि ती सुटकेस नाल्यात फेकून दिली. दुपारी साडेतीनच्या सुमारास या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर आपणच या मुलाचा खून केल्याची कबुली या मुलाने दिली. अल्पवयीन मुलाने आपण दहा वर्षांच्या मुलाच्या वडिलांकडे पाच लाखांची खंडणी मागितल्याचीही कबुली दिली.

साकीनाका भागात असलेला एक दहा वर्षांचा मुलगा २० डिसेंबरला शिकवणीला गेला आणि परतलाच नाही. ज्यानंतर त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून तपास केला, ज्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मुलाचा खून कसा करण्यात आला ते स्पष्ट होणार आहे असे पोलिसांनी सांगितले. आरोपी अल्पवयीन मुलगा याने जेव्हा दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याने एक तास या मुलाच्या वडिलांसोबतही घालवला. मुलाच्या वडिलांनाही तुमचा मुलगा शोधण्यास मदत करतो असे आश्वासन दिले. तसेच या मुलाची हत्या केल्यानंतर ज्या सुटकेसमध्ये त्या मुलाचा मृतदेह भरला होता ती घेऊनही हा अल्पवयीन आरोपी फिरत होता. या मृतदेहाचे काय करायचे ते त्याला समजले नाही म्हणून त्याने तो नाल्यात फेकला.

आपण पकडले जाऊ या भीतीने सुरुवातीला हा अल्पवयीन आरोपी खोटं बोलत होता. मात्र पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला आणि क्राइम पेट्रोल ही सीरियल पाहून आपण हा कट रचल्याचेही त्याने स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक सुनील माने आणि डीसीपी नविनचंद्र रेड्डी यांनी या प्रकरणात लक्ष घालत अल्पवयीन आरोपीला पकडले आणि या हत्येचा छडा लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 9:26 pm

Web Title: minor boy killed 10 year old boy in mumbai after watching crime patrol
Next Stories
1 दोलायमान भांडवली बाजारात गुंतवणूक धोरण कसे असावे?
2 महोत्सवांना बेशिस्तीचे गालबोट!
3 अनुदानित शाळांना बंद पालिका शाळांची आस
Just Now!
X