News Flash

अल्पवयीन मित्रांनी केला बालिकेचा लैंगिक छळ

मुंबईत एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा दहा आणि अकरा वर्षाच्या दोन मुलांनी लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईत एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा दहा आणि अकरा वर्षाच्या दोन मुलांनी लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पोलिसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांना डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे. अंधेरी पश्चिमेला एका टॉवरमध्ये ३० जानेवारी रोजी ही घटना घडली.

ही तिन्ही मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी अल्पवयीन मुलांनी पीडित मुलीचा लैंगिक छळ केला. एक फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीवरुन आंबोली पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. ही दोन्ही मुले पीडित मुलीला १२ आणि १३ व्या मजल्याच्या कॉरिडोरमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी तिचा लैंगिक छळ केला.

दुसऱ्यादिवशी सकाळी जेव्हा मुलीला त्रास सुरु झाला तेव्हा तिने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 2:39 pm

Web Title: minor boys booked for sexually assault minor girl
Next Stories
1 Loksatta Tarun Tejankit: गेल्या वर्षी मुक्ता बर्वेनं मारली बाजी! यंदा तुमचा नंबर?
2 मुंबईकरांच्या विमान प्रवासाचे दर गगनाला, तिकीट दरांमध्ये 20 ते 50 टक्क्यांची वाढ
3 तेलतुंबडेप्रकरणी पोलिसांना पाठिंब्याची गरज : उद्धव ठाकरे
Just Now!
X