तरुणाच्या कृत्याने त्रस्त होऊन जाळून घेतलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची शुक्रवारीही मृत्यूशी झुंज सुरू होती. पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी अन्य एका मुलीचा जबाब नोंदविला असून आरोपीवर ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भांडुपच्या उत्कर्ष येथे राहणाऱ्या  समीर घोगरे (३३) हा तिला सतत मोबाईलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवून तिची छेड काढत असे. समीरची दहशत एवढी होती की मुलीने आपल्या घरी यासंदर्भात काही सांगितले नव्हते.  शेवटी त्रास अस’ा झाल्याने तिने मंगळवारी रात्री केरोसिन अंगावर ओतून स्वत:ला जाळून घेतले. ती ८० टक्के भाजली असून तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.