News Flash

अल्पवयीन मुलीवर खारघरमध्ये बलात्कार

संतोष कुमार (वय २८) असे आरोपीचे नाव असून तो खारघर येथील राहणारा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : कामाच्या शोधात असलेल्या मानखुर्दमधील एका अल्पवयीन मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चार दिवसांपूर्वी नवी मुंबई येथे घडलेल्या घटनेत मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी आरोपीला अटक केली.

संतोष कुमार (वय २८) असे आरोपीचे नाव असून तो खारघर येथील राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीची ओळख संतोषशी झाली होती. मुलीला कामाची गरज असल्याने तिने त्याबाबत संतोषकडे विचारणा केली. त्यानुसार त्याने या मुलीला गुरुवारी एका कॅटरिंगच्या कामासाठी नेले. पुन्हा दुसऱ्या दिवशीही तिला कामाच्या निमित्ताने आरोपीने त्याच्या खारघर येथील घरी नेले. या ठिकाणी त्यांनी या मुलीवर बलात्कार करून तिला दुसऱ्या दिवशी मानखुर्द येथे सोडले. मात्र त्यानंतर मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:35 am

Web Title: minor girl raped in kharghar
Next Stories
1  ‘तरुण तेजांकित’ नावनोंदणीसाठी आज शेवटचा दिवस
2 असहिष्णू वातावरणात चित्रपटसृष्टी गप्प का?
3 गँगस्टर, बुकी पप्पू सावलाला मुंबई पोलिसांनी केले तडीपार
Just Now!
X