अॅण्टॉप हिल येथील इंदिरा नगर येथेही एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी के. डी. राजू (३६) याला अटक केली आहे. रविवारी ही मुलगी आपल्या आजीला भेटण्यासाठी रे रोड येथे गेली होती. तेथून रात्री ११ वाज्ता ती आपल्या घरी परतत होती. रस्त्यात भेटलेल्या राजू याने तिला मोटारसायकलीवरून घरी सोडतो, असे सांगितले. पण तो तिला आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. रात्री १ वाजता त्याने तिला तिच्या घरी सोडले. तिने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. अॅण्टॉप हिल पोलिसांनी सोमवारी राजूला अटक केली. त्याच्यावर काही गुन्ह्यांची नोंद आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 1:01 am