News Flash

नॅशनल पार्कजवळ चिमुरडीची बलात्कार करून हत्या

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील महामार्ग पदपथावरील पुलाखालील झोपडीत राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचा मृतदेह रविवारी सकाळी नजीकच्या पुलाजवळ आढळला.

| September 1, 2014 01:45 am

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोरील महामार्ग पदपथावरील पुलाखालील झोपडीत राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीचा मृतदेह रविवारी सकाळी नजीकच्या  पुलाजवळ आढळला. या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पदपथावरील पाच ते सहा वर्षे वयोगटातील बालिकांना पळवून नंतर त्यांच्यावर बलात्कार केल्याची गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
पीडित बालिकेचे कुटुंब पुलाखालील झोपडीत राहते. शनिवारी रात्री बालिका गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कुटुंबासमवेत गेली होती. रात्री सर्वजण घरी परतले.  परंतु रविवारी सकाळी सात वाजता आईला बालिका जागेवर नसल्याचे दिसले. शोधाशोध सुरू असताना काही अंतरावर असलेल्या एका पुलाखाली तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. तिच्या शरीरावर जखमा होत्या. लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली असावी, असा संशय आहे. पुलाखाली सीसीटीव्ही नसला तरी या परिसरातील सीसीटीव्हीमधील फुटेजच्या आधारे तपास करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप रुपवते यांनी सांगितले.
दहा दिवसांतील तिसरी घटना
गुन्हेगार एकच?
गेल्या २१ ऑगस्ट रोजी कांदिवली येथे रस्त्यावर झोपलेल्या एका सहा वर्षीय बालिकेला पळवून नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीचे रेखाचित्र बनवले आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. गुरुवारी कोपरखैरणे येथे ६ वर्षीय बालिकेवर अफझुद्दीन शेख (५२) नावाच्या आरोपीने बलात्कार केला होता. त्याला अटक केली आहे. कांदिवली आणि बोरिवली येथील दोन्ही घटनांमधील आरोपी एकच असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:45 am

Web Title: minor girls raped murdered at national park
Next Stories
1 भाभा रुग्णालयात जमावाचा धुडगूस
2 दुभाषकाने माजी इराकी सैनिकाला लुटले
3 शिक्षक-विद्यार्थ्यांशी संवादाआधीच वाद
Just Now!
X