20 January 2018

News Flash

बिबळ्याच्या हल्ल्यात अल्पवयीन ठार

एकटेदुकटे गाठून वा अल्पवयीन मुलांवर बिबळ्यांकडून अधूनमधून हल्ला होण्याचे प्रकार मध्यंतरी थांबलेले असतानाच शनिवारी सायंकाळी उशिरा १३ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून बिबळ्याने

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 28, 2013 3:43 AM

एकटेदुकटे गाठून वा अल्पवयीन मुलांवर बिबळ्यांकडून अधूनमधून हल्ला होण्याचे प्रकार मध्यंतरी थांबलेले असतानाच शनिवारी सायंकाळी उशिरा १३ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून बिबळ्याने ठार केले. या मुलासोबत असलेला त्याचा मित्र मात्र बचावला.
गोरेगाव पूर्व येथील आरे दुग्ध वसाहतीतील आदर्श नगर परिसरात राहमारा सौरभ ठाकूर (१३) हा अल्पवयीन मुलगा आशिष यादव या मित्रासह सायंकाळी सव्वासातच्या सुमारास शौचासाठी जंगलात गेला होता. त्याचवेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबळ्याने सौरभवर हल्ला केला आणि त्याला फरफटत जंगलात नेले. या घटनेने हादरलेल्या आशिषने आरडाओरड केली. त्यामुळे स्थानिक रहिवासी तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी सौरभचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. बऱ्याच काळानंतर सौरभचा मृतदेह जंगलात आढळून आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुरक्षा रक्षकांनी गस्तही वाढविली होती. रात्रीच्या वेळी शक्यतो शौचास जाण्यास प्रतिबंध केला होता. परंतु हा प्रकार सायंकाळच्या वेळी घडल्याने रहिवाशांमध्ये पुन्हा बिबळ्याची दहशत पसरली आहे.

First Published on January 28, 2013 3:43 am

Web Title: minor killed in attack of panther
  1. No Comments.