News Flash

मिरा-भाईंदर : प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

चार मुख्य आरोपी असून ३५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर पाच दिवसानंतर काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात चार मुख्य आरोपी असून ३५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना रविवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर  मारहाण केली होती व या मारहाणीचा व्हिडिओ देखील तयार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिले होते. परंतु पाच दिवस उलटले तरी गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला  होता. त्यामुळे अखेर सुनील कदम, विकास फाळके, सचिन फोफळे, करण आणि ३५ व्यक्तींविरोधात काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, शासकीय कामात अळथला आला असल्यास तसा अहवाल पालिका प्रशासनाकडे मागितला असून, त्या अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारें यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 5:03 pm

Web Title: mira bhayander filed a case against those who assaulted the ward officer msr 87
Next Stories
1 सीबीआयचं पथक पोहोचलं सुशांत सिंहच्या घरी; पाहणी करतानाचे फोटो आले समोर
2 ‘तो फोन कोणी केला?, मृतदेह आधी कोणी पाहिला आणि…’; सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंहला CBI ने विचारले हे दहा प्रश्न
3 कोकणातल्या बाप्पांचे वसईत स्थलांतरण!
Just Now!
X