मिरा-भाईंदर परिसरात भाजपाकडून आयोजित “कॉफी विथ युथ” या कार्यक्रमात दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितच भाजपामधील अंतर्गत वाद समोर आला आहे. कार्यक्रमात भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनादरम्यान हा वाद उफाळून आला.

आगामी विधानसभा निवडणुकीसीठी  हे दोघेही मिरा-भाईंदर मतदार संघातून  इच्छुक आहेत. कार्यक्रमस्थळी उपस्थित दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये  सुरूवातीस शाब्दिक बाचाबाची झाली व नंतर हा वाद वाढला. गीता जैन यांना बसण्यास जागा न मिळाल्याने त्यांनी हा कार्यक्रम मंचाच्या जवळ उभा राहूनच पाहिला. तर त्यांच्या समर्थकांनी हा स्त्री जातीचा अपमान झाला असल्याचा आरोप केला .