कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात एका तरुणीचा रस्त्यातून जात असताना एका तरुणाने विनयभंग केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
कोळसेवाडी भागात राहणारी तरुणी एफ केबिन येथून जात असताना याच भागात राहणारा मांॅटी ऊर्फ राजू हा तरुण या तरुणीच्या समोर आला. तू माझ्याशी लग्न करणार की नाही, नाही तर तुला बदमान करीन, अशी धमकी दिली. या तरुणीने घरी हा प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार राजूचा पोलीस शोध घेत आहेत.