जुहू येथे शाळेच्या बसमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना ताजी असताना आता मालाडमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. एका तीन वर्षीय मुलीचा विनयभंग शाळेच्या बसमध्ये क्लिनरने केला. मालाड पोलिसांनी या प्रकरणी शाळेच्या बसचा क्लिनर संदीप मांढरे (२४) याला अटक केली आहे.
मालाड पश्चिमेला राहणारी ही तीन वर्षांची मुलगी मालाडच्याच एका प्रख्यात शाळेत प्ले ग्रुपमध्ये शिकत होती. ती रोज शाळेच्या बसमधूनच शाळेत जात होती. त्याच्याशी गैरप्रकार होत असल्याचे २१ फेब्रुवारीला तिच्या पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी या प्रकरणी मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या शाळेच्या बसमध्ये महिला मदतनीस होती. पण तिने कानावर हात ठेवले. पोलिसांनी क्लिनरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने या मुलीचा विनयभंग केल्याचे मान्य केले. त्याला विनयभंग आणि लहान मुलांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये अटक केली असून मंगळवापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
शाळेच्या बसच्या क्लिनरकडूनच विनयभंग होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 3:13 am