News Flash

दाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे हुकली – प्रकाश आंबेडकर

'दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली'

दाऊद अब्राहिम भारताकडे सरेंड करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

‘1993 च्या मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता’, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लंडनमध्ये दाऊद अब्राहिम आणि राम जेठमलानी यांची भेट झाली होती. त्यावेळी त्याने आपण आत्मसमर्पण करण्यास तसंच न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला होता. मला जेलमध्ये ठेवलं तरी चालेल असं त्याचं म्हणणं होतं. त्याची एकच मागणी होती की थर्ड डिग्री वापरली जाऊ नये. राम जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांकडे दिली होती’.

परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या निर्णयात युपीए सरकार सुद्धा सहभागी आहे असं सांगण्यात आलं होतं असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. ‘जर दाऊद समर्पण करायला तयार होता तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही याचा खुलासा होणे आवश्यक आहे’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी ही माहिती त्यावेळच्या पंतप्रधानांना दिली का याचा खुलासा होणे आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘ज्यावेळी हे सर्व उघड झालं त्यावेळी 2015 मध्ये नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार होते. मग त्यांनी सुद्धा त्यावेळी दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?’, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी प्रस्ताव का फेटाळला ? कोणाच्या सांगण्यावरुन फेटाळला ? आणि हे उघड झाल्यानंतर सध्याच्या भाजपा सरकारने का प्रयत्न केले नाहीत याचा खुलासा कऱण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2019 12:51 pm

Web Title: missed opportunity to bring back dawood because of sharad pawar says prakash ambedkar
Next Stories
1 शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला ह्रदयविकाराचा झटका
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 फुगे फेकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा
Just Now!
X