26 September 2020

News Flash

बेपत्ता दाम्पत्याची रहस्यमय आत्महत्या?

दादर परिसरातून मंगळवारी बेपत्ता झालेल्या रेखा आणि गणेश भिसे या दाम्पत्याचे मृतदेह बुधवारी वरळी आणि दादर समुद्रकिनाऱ्यांवर आढळून आले. दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

| June 27, 2013 03:32 am

दादर परिसरातून मंगळवारी बेपत्ता झालेल्या रेखा आणि गणेश भिसे या दाम्पत्याचे मृतदेह बुधवारी वरळी आणि दादर समुद्रकिनाऱ्यांवर आढळून आले. दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  रेखा (४०) आणि गणेश (४५) दादरच्या महाकाली नगरातील झोपडपट्टीत राहत होते. दोघेही मोलमजुरी करीत. मंगळवारी रात्री ‘बाहेर जातो, घरावर लक्ष ठेव’ असे सांगून दोघे निघाले होते. दोघेही सकाळपर्यंत परतले नसल्याने भिसे यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात दिली होती.
दरम्यान, बुधवारी सकाळी वरळी समुद्र किनाऱ्यावर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनासाठी तो मृतदेह पोद्दार रुग्णालयात नेण्यात आला. याच रुग्णालयात गणेश यांची आई काम करते. योगायोगाने त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो आपली सून रेखा हिचा असल्याचे ओळखले. पाठोपाठ बुधवारी रात्री उशीरा दादर समुद्रकिनाऱ्यावर गणेश यांचाही मृतदेह आढळून आला.
भिसे दांपत्य राहात असलेल्या जागेवरून बिल्डरशी त्यांचा वाद होता. बिल्डरच्या लोकांनी त्यांना धमकावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तर पती पत्नीची भांडणे झाल्याचेही शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 3:32 am

Web Title: missing couple commit mysterious suicide
Next Stories
1 कल्याण- डोंबिवली पालिकेतील लेटलतीफांविरुद्ध ‘गांधीगिरी’
2 तुभ्रे येथे कडकडीत बंद
3 मुंबई तापाने त्रस्त
Just Now!
X