पार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाने अचानक मूल्यांकन पद्धत बदलल्यामुळे नुकसान होत असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला असून महाविद्यालयाने अद्यापही मूल्यांकन प्रणालीचा गोंधळ स्पष्ट न केल्यामुळे विद्यार्थी अस्वस्थ आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने १० स्तरातील श्रेयांक प्रणाली लागू केल्यावर मिठीबाई महाविद्यालयानेही त्यांच्या मूल्यांकन प्रणालीत बदल केले. पहिल्या वर्षांसाठी सात स्तरांची मूल्यांकन प्रणाली आणि त्याच विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षांसाठी दहा स्तरांची मूल्यांकन प्रणाली महाविद्यालयाने लागू केली. मात्र, अचानक दुसऱ्या वर्षांसाठी श्रेयांक प्रणाली बदलल्यामुळे श्रेणीवर परिणाम होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.