18 January 2019

News Flash

आमदार अनिल बोंडे, राहुल कुल, अनिल परब, भाई गिरकर उत्कृष्ट संसदपटू

वर्षा गायकवाड, राजेश टोपे, धैर्यशील पाटील, राहुल नार्वेकर, कपिल पाटील, प्रवीण दरेकर यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विधान परिषद आणि विधान सभा अशा दोन्ही सभागृहातील वर्ष २०१५ ते २०१८ या कलावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विधान परिषद आणि विधान सभा अशा दोन्ही सभागृहातील वर्ष २०१५ ते २०१८ या कलावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे (२०१५-१६), सुभाष साबणे (२०१६-१७) आणि राहुल कुल यांना (२०१७-१८) या वर्षांसाठी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला. तर उत्कृष्ट भाषणासाठी प्रा. वर्षा गायकवाड (२०१५-१६), राजेश टोपे (२०१६-१७) आणि धैर्यशील पाटील (२०१७-१८) यांना पुरस्कार जाहीर झाला.

तर विधान परिषद सदस्यांमधून उत्कृष्ट संसदपटू म्हणून अॅड. अनिल परब (२०१५-१६), विजय उर्फ भाई गिरकर (२०१६-१७), संजय दत्त (२०१७-१८) यांना मिळाला. तर उत्कृष्ट भाषणासाठी अॅड. राहुल नार्वेकर (२०१५-१६), कपिल पाटील (२०१६-१७) आणि प्रवीण दरेकर (२०१७-१८) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

First Published on May 17, 2018 2:38 pm

Web Title: mla anil bonde rahul kul anil parab bhai girkar sanjay dutt best sansadh patu