News Flash

‘एमएमआरसीएल’कडून मियावाकी पद्धतीने वृक्षांचे रोपण

पालिकेच्या वीर सावरकर उद्यानात या पद्धतीने नऊ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार

(संग्रहित छायाचित्र)

गोरेगाव येथे ९ हजार झाडांचे उद्यान

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे  (एमएमआरसीएल) गोरेगाव येथील तीन हजार चौरस मीटर जागेवर मियावाकी पद्धतीने उद्यान विकसित केले जाणार आहे. पालिकेच्या वीर सावरकर उद्यानात या पद्धतीने नऊ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार असून त्याला सोमवारपासून सुरुवात झाली.

मियावाकी पद्धतीने झाडांचे रोपण केल्यास ती झपाटय़ाने वाढतात. तसेच घनदाट वन तयार होते. त्यामुळे एमएमआरसीएलकडून हे उद्यान विकसित केले जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र-एफडीसीएम) मदत घेतली जात आहे. गोरेगाव पश्चिमेला ‘माइंड स्पेस’ भागात इनॉर्बिट मॉलजवळ हे उद्यान विकसित केले जाणार आहे. यात काथ, कडुलिंब, आवळा, बकुळ, सीताफळ, अशोक, चिंच, अर्जुन, बदाम, शिसव, नारळ, आंबा, सुपारी, कांचन, बेल अशा देशी वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. हे उद्यान पुढील तीन महिन्यात विकसित केले जाणार आहे. तर पुढील दोन वर्ष ‘एफडीसीएम’द्वारे या झाडांचे संवर्धन केले जाणार आहे. त्यानंतर हे उद्यान पालिकेच्या ताब्यात दिले जाईल, असे एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो-३ मार्गिकेच्या कामात अनेक झाडे तोडावी लागली होती. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून एमएमआरसीएलकडून ही झाडे लावण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी एमएमआरसीएलकडून झाडे आणि कांदळवने लावण्यात आली आहेत.

पुढील जागतिक पर्यावरण दिनापर्यंत या झाडांचे पूर्णत: विकसित वनामध्ये रूपांतर होणे अपेक्षित आहे, असे एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:42 am

Web Title: mmrcl planting trees by miyawaki method in goregaon zws 70
Next Stories
1 आरेकडून वन विभागाला ८१२ एकर जागेचा ताबा
2 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची एक हजार पेट्रोल पंपांवर निदर्शने
3 निर्बंध हटताच बाजारात चैतन्य!
Just Now!
X