News Flash

मुंबई मोनो रेलसाठी ५०० कोटींची चायनीज कंपनीची निविदा रद्द करण्याचा एमएमआरडीएचा निर्णय

एमएमआरडीएचा मोठा निर्णय

मुंबईतील मोनो रेलसाठीची ५०० कोटींची चायनीज कंपनीची निविदा रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एएमआरडीए प्रशासनाकडून १० मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार होते. हे कंत्राट अंतिम टप्प्यात होते. मात्र या दोन्ही चिनी कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या चिनी कंपन्यांऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु आहे.

या चिनी कंपन्यांकडून वारंवार मोनोरेलच्या कंत्राटातील अटी-शर्थींची फेरमांडणी करा असे सुचवण्यात येत होते. मात्र एमएमआरडीए प्रशासनाला ते मान्य करणं शक्य नव्हतं. तसंच  मेक इन इंडिया सारखा उपक्रम आणि भारतीय कंपन्यांना चालना देण्यासाठी एमएमआरडीएनं हे कंत्राट चिनी कंपन्यांकडून काढून घेण्याचे ठरवले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यात सोमवारी झालेल्या हिंसक संघर्षामुळे सीमेवर तणावाचं वातवारण आहे. चीनने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यानंतर आता भारताकडून चीनला अद्दल घडवण्यासाठी तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तसेच आर्थिक व्यवहारातही भारतानं युद्ध आरंभलं आहे. देशभरात चिनी कंपन्या आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं सत्र सुरु झालं आहे. अनेक संस्थांकडूनही अशी आवाहनं करण्यात येत आहेत.

मात्र, चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासठी भारतातील मोठ्या प्ररकल्पांमधूनही चिनी कंपन्यांना हद्दपार करणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (MMRDA) मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट रद्द केले आहेत. १० मोनोरेलच्या रॅकसाठी दोन चिनी कंपन्यांना दिले जाणारे कंत्राट अंतिम टप्प्यात होते. मात्र, दोन्ही चिनी कंपन्यांचे ते कंत्राट आता रद्द करण्यात आले आहेत. त्या ऐवजी BHEL आणि BEML या भारतीय कंपन्यांना हे कंत्राट देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2020 6:13 pm

Web Title: mmrda decides to cancel tender of rs 500 crore chinese company for mumbai mono rail scj 81
टॅग : Monorail
Next Stories
1 खासगी रुग्णालयांची मनमानी बंद!
2 करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा राम कदम यांचा निर्णय
3 बाधितांमध्ये ‘अत्यावश्यक’ कर्मचारी जास्त
Just Now!
X