06 July 2020

News Flash

‘कृष्णकुंज’बाहेर मनसैनिकांची उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

सहा नगरसेवक सोडून गेले तरी फरक नाही पडत

संग्रहित छायाचित्र

मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. शनिवारी ‘कृष्णकुंज’बाहेर मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली. सहा नगरसेवक सोडून गेले तरी फरक नाही पडत, आम्ही राज ठाकरेंसोबत आहोत असे या मनसैनिकांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने मनसेला जोरदार धक्का दिला असून याचे पडसाद शनिवारीही उमटले. मनसैनिकांनी कृष्णकुंजबाहेर गर्दी केली. पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या वॉर्डातील शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्षांशी राज ठाकरेंनी चर्चा केली. नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची माहिती होती का, भविष्यातील वाटचाल काय असेल आदी विषयांवर राज ठाकरेंनी चर्चा केल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना संतप्त मनसैनिकांनी कृष्णकुंजबाहेर शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरेंविरोधातही मनसैनिकांनी घोषणा दिल्या. ‘सहा नगरसेवक गेले तरी फरक पडणार नाही, आम्ही कट्टर राज ठाकरे समर्थक आहोत’, असे मनसैनिकांनी सांगितले. नगरसेवकांनी गद्दारी केली तरी आता जनताच याचा बदला घेणार, उद्धव ठाकरेंनी भावाच्या पाठीत खंजीर खुपसायला नको हवा होता, अशा प्रतिक्रियाही मनसैनिकांनी दिल्या.

मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने भीती दाखवली म्हणून सैरभर होऊन नीतिमत्तेचा जो बाजार मांडला गेला तो म्हणजे दिवाळीआधीचं लक्ष्मीपूजन असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचा महापौर मराठी व्हावा म्हणून फेब्रुवारी २०१७ ला तिजोरी उघडून दिलेली, आता चोरीची काय गरज स्वभावाला औषध नसते असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2017 3:12 pm

Web Title: mns 6 corporators joins shiv sena party worker gather outside krishna kunja slogans against uddhav thackeray
Next Stories
1 सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई ४५ व्या स्थानी; टोकियो पहिल्या क्रमांकावर
2 माफियांच्या पैशांमधून नगरसेवकांची खरेदी; सोमय्यांचा सेनेवर आरोप
3 महापालिकांमधील मतदान चिठ्ठीचा प्रयोग यशस्वी
Just Now!
X