News Flash

प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांचा दणका

रिक्षाचालक 20 रुपये शेअरिंग असतानाही प्रवाशाकडे 30 रुपये भाडं मागत होता

जादा रिक्षाभाडं मागत प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला आहे. मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाकडे जादा भाडं मागत मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील होता. एका तरुणीने हा व्हिडीओ शूट केला होता. व्हिडीओत रिक्षाचालक तरुणावर हात उचलत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक 20 रुपये शेअरिंग असतानाही प्रवाशांकडे 30 रुपयांची मागणी करत होता. यावरुन तरुणाचा रिक्षाचालकासोबत वाद सुरु होता. अत्यंत उद्धट भाषेत रिक्षाचालक तरुणाशी बोलत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे घेत हातही उचलताना दिसत आहे. यावेळी तिथे उपस्थित तरुणी हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये शूट करते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाचा शोध घेत मनसे स्टाइलने कारवाई केली. फेसबुकवर त्यांनी यासंबंधी व्हिडीओही शेअर केले आहेत. यामध्ये मनसे कार्यकर्ते त्याला समज देत असल्याचं दिसत आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 6:41 am

Web Title: mns activist handover rickshaw driver to bkc police after video of hitting passenger went viral
Next Stories
1 उद्योगासाठी दिलेली सरकारी जमीन इमारतींसाठी खुली
2 करबुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव?
3 एकत्र निवडणुकीस भाजपचा विरोध
Just Now!
X