News Flash

मिरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची पालिका अधिकाऱ्याला मारहाण

काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

प्रतिकात्मक छायाचित्र

मिरा-भाईंदर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. कार्यालयात मद्यपान करत असल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यावर आरोप केला आहे. या संदर्भात काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक-६ चे अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना सोमवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालय बाहेर मारहाण केली, विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, प्रकाश कुलकर्णी कार्यलयात निवृत्त अधिकरी दादा साहेब खेत्रेसह मद्यपान करत होते. तसेच, प्रभाग कार्यालयाच्या बाहेर तशा दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या असल्याचेही मनसे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे. तर, प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन, वैद्यकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, घटनास्थळी दारूच्या बाटल्या पोलिसांना मिळाल्या नसून, या प्रकरणी लिखीत तक्रार आल्या नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, काशीमिरा पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 3:54 pm

Web Title: mns activists beat up municipal officer in mira bhayander msr 87
Next Stories
1 “मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा कुठे होतात?,” संजय राऊत यांचा टीकाकारांना सवाल
2 डॉक्टर देवदूतांसारखे, मी त्यांचा अपमान केलेला नाही; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
3 महाराष्ट्रातले मॉल्स उघडू शकतात तर मंदिरं का नाही?-राज ठाकरे
Just Now!
X