News Flash

कल्याणच्या एसएम 5 मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेऊ न दिल्याने मनसेचा राडा

मल्टिप्लेक्समधले खाद्यपदार्थही महाग दरातच विकण्यात येत होते याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते तिथे गेले आणि एकच राडा झाला.

कल्याणच्या एसएम 5 या मल्टिप्लेक्समध्ये मनसेने राडा केल्याचे समोर आले आहे. १ ऑगस्टपासून बाहेरचे खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तरीही बाहेरचे पदार्थ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली. तसेच मल्टिप्लेक्समधले खाद्यपदार्थही महाग दरातच विकण्यात येत होते याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते तिथे गेले आणि एकच राडा झाला.

मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती इतक्या जास्त का आहेत? असा प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले होते. ज्यानंतर मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ नेण्यास बंदी नाही. अशी बंदी कुठे आढळली तर त्या मल्टिप्लेक्सवर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली होती.

दरम्यान प्रेक्षकांना १ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्स बाहेरचे खाद्य नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही? हे तपासले मनसेच्या कानचेक आंदोलनात तपासले जाणार आहे. अंमलबजावणी झाली नसेल तर मल्टिप्लेक्सच्या स्टाफला कानाखाली लगावून कानचेक आंदोलन होणार आहे. हे आंदोलन सुरू होण्याआधीच कल्याणच्या मल्टिप्लेक्समध्ये मनसेने राडा केल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 7:15 pm

Web Title: mns agitation at kalyan sm5 multiplex against high food rates
Next Stories
1 मराठा आरक्षणासाठी अमरावतीमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
2 व्यसनाला कंटाळून महिलेकडून पोटच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
3 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात श्रीपाद छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी
Just Now!
X