News Flash

मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ २५ सप्टेंबरला

दीर्घकाळापासून महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ येत्या २५ सप्टेंबरला म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेला जाहीर केली जाणार आहे, असे मनसे अध्यक्ष

| September 6, 2014 08:41 am

दीर्घकाळापासून महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची  ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ येत्या २५ सप्टेंबरला म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेला जाहीर केली जाणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे अखेर मनसेच्या ब्ल्यू प्रिंटला मुहूर्त मिळाला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल अद्याप निर्माण झालेला नाही, प्रसार माध्यमे आणि राजकीय पक्ष वगळता सामान्य मतदारांपर्यंत निवडणुकीचे वातावरणदेखील नाही, त्यामुळे आता ती जाहीर केली, तर निवडणुकीपर्यंत नागरिकांच्या लक्षात राहणार नाही, म्हणून ब्लू प्रिंटसाठी २५ तारखेचा दिवस निश्चित केल्याचे राज ठाकरे म्हणाले. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, संपादक, व काही मान्यवरांच्या उपस्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ती जाहीर करणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचा पुढील ५० वर्षांत विकास कसा करता येईल, याच्या अभिनव संकल्पना त्यामध्ये असतील. डॉक्युमेंटरी, वेबसाईट व पुस्तिकेच्या स्वरुपात ती असणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 8:41 am

Web Title: mns blueprint to unveiled on 25 september
Next Stories
1 राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा
2 ‘चिनी दरवळ’ भारतीय कामगारांच्या मुळावर!
3 बबनराव घोलप यांचा पाय आणखी खोलात!
Just Now!
X